Breaking News

तामिळनाडूची अनुकृती वास ‘मिस इंडिया 2018’

मुंबई - फेमिना मिस इंडिया 2018 ची अंतिम फेरी मुंबईत पार पडली. फेमिना मिस इंडिया 2018 च्या जेतेपदावर तामिळनाडूच्या अनुकृती वासने नाव कोरले आहे. तिने 29 स्पर्धकांना मागे टाकत हा किताब पटकावला. या स्पर्धेत हरियाणाची मिनाक्षी चौधरी प्रथम उपविजेती तर आंध्रप्रदेशची श्रेया राव ही दुसरी उपविजेती ठरली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित, करिना कपूर खान आणि जॅकलीन फर्नांडिस या सेलिब्रिटींनी आपले धमाकेदार नृत्य सादर करत या सोहळ्यात रंगत आणली. दिग्दर्शक क रण जोहर आणि आयुष्यमान खुराणा यांनी सूत्रसंचालनाची बाजू सांभाळली.