Breaking News

जुगार अड्ड्यांवर सलग तिसऱ्या दिवशीही कारवाई



श्रीगोंदा प्रतिनिधी 

तालुक्यातील काष्टी, निमगावखलू येथील जुगार अड्ड्यांवर कारवाई केल्यानंतर आज सलग तिसऱ्या दिवशी श्रीगोंदा पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या पथकाने लोणीव्यंकनाथ येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत तिरट नावाचा पत्त्याचा हारजितीचा खेळ खेळणारे व खेळवित असलेल्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

या आरोपींकडून १ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पो. नि. पोवार यांना खबऱयामार्फत माहिती मिळाली, की श्रीगोंदा तालुक्यातील लोणीव्यंकनाथ गावातील झुंबर भाऊसाहेब काकडे यांच्या पडक्या घराच्या आडोशाला बसून काहीजण तिरट नावाचा पत्त्याचा हारजितीचा खेळत आहेत. त्यानुसार त्यांनी त्याठिकाणी पोलीस पाठवून सदर ठिकाणी जुगार खेळत असणारे झुंबर काकडे, भानुदास विठ्ठल नगरे, बाळू नाथा थोरात, संतोष सोनबा खलाटे {सर्व रा. लोणीव्यंकनाथ } या चार जणांना ताब्यात घेतले. या सर्वांविरुद्ध सर्वाणविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे