Breaking News

जगाला शांतीचा संदेश देणारा धर्म इस्लाम

(मागील अंकावरून)
त्यांनी पैगंबरांना संपवीण्याच्या योजना आखणे चालु केले. ही बाब पैगंबरांच्या लक्षात येताच त्यांनी चुलत बंधु अली यांना सांगीतले की मी मदीना येथे जात आहे. तु ही लोकांच्या ठेवी त्यांना काळजीपूर्वक परत करून मदीन्याला ये . कुरैश हे पैगंबरांचे कट्टर शत्रु होते तरीही आपल्या मौल्रवान वस्तु मोठ्या विश्‍वासाने पैगंबरांकडे ठेवी स्वरूपात अमानत म्हणुन ठेवत असत. यावरूनच पैगंबरांच्या विश्‍वासार्हते बद्दल आपल्याला कल्पना येऊ शकते. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) व हजरत अबु बक्र(रजी.) मक्का सोडुन मदीन्या कडे निघाले. मात्र कुरैश लोकांनी त्यांना पकडण्यासाठी सैन्य पाठविले. मात्र ते त्यांना पकडु शकले नाहीत. मदीण्यात पैगंबरांचे जंगी स्वागत करन्यात आले. मक्का येथे मुस्लीमांचा छळ चालुच होता. त्यांच्या घरादारांचा लिलाव करन्यात आला. संपत्तीची लुट केली गेली. मदीन्यातही काही कपटचारी मुनाफीक लोक तिकडची खबर मक्कामध्ये पाहोच करण्याचे काम करीत होते. मुस्लीम द्वेषाने कुरैश तडफडत होते. मुस्लीम मात्र सत्य मार्गासाठी आपली संपत्ती, घर दार सोडुन केवळ संयम बाळगुन होते. कुरैशांनी मोठ्या सैन्यासह मदीन्यातील मुस्लीमांवर चाल केली. आता मात्र संयमाचा बांध फुटला. कुरआन चा आदेश मिळला- अन्याया विरोधात लढा. आता मुस्लीमांनीही सत्य धर्माच्या रक्षणासाठी हातात तलवार उचलली. सत्याची स्थापना करन्यासाठी व अन्याय अत्याचार व आतंकवादाला समाप्त क रन्यासाठी जिहाद ( धर्मरक्षा व आत्मरक्षासाठीचे युद्ध ) चा आदेश मिळाल्यावर पैगंबरांनी या युद्धात विजय मिळविला. ही बदरची लढाई म्हणुन प्रसिद्ध आहे. या युद्धातहि पैगंबरांनी आपल्रा सैन्याला आदेश दिला होता की स्त्रीया, बालके व वृद्धांवर हाथ उचलु नका. हिरवी झाडे कापू नका. असहाय लोकांवर निशाणा साधु नका. शेतात काम करणार्यांवर वार करू नका. केवळ त्यांच्याशीच युद्ध करा ज्यानी तुम्हाला बरबाद केले. ज्यांनी तुमचे घरदार लुबाडले. या युद्धात हजारो काफीरांविरूद्ध के वळ 313 मुस्लीमांनी लढा दिला व विजय मिळवीला. या युद्धात पकडलेल्रा युद्ध कैद्यांनाही पैगंबरांनी अतिशय सन्मानाची वागणूक दिली. या पराजयाचा बदला घेन्या साठी मक्केच्या सैन्याने पुन्हा एकदा मुस्लीमांवर चाल केली. यावेळी पैगंबरांचे चुलते हजरत हम्जा (रजी.) शहिद झाले. त्यांच्या मृतदेहाची विटंबना करन्यात आली. या युद्धात पैगंबरांच्या विरोधात लढणारे अनेकजण कालांतराने इस्लाम च्या सत्य मार्गाने प्रभावीत होवुन मुस्लीम झाले. पैगंबरांनी मदीना येथे राहुनच विवीध राज्यातील राजांना इस्लामचा संदेश दिला. संपुर्ण अरब राष्ट्रात इस्लामचा बोलबाला झाला. दरम्यानच्या काळात कुरैशांची दगाबाजी चालुच होती. मक्केतील काफीर व मदीना वासीयांमध्ये झालेला तह मक्केवाल्या कुरेशांनी मोडला. कुरैशांच्या दगाबाजीमुळे शेवटी 10 हजारांचे सैन्य घेऊन पैगंबर मक्केकडे निघाले. तेव्हा मात्र मक्का येथील क ाफीरांची तारांबळ उडाली. सर्वजण घाबरून गेले. मात्र पैगंबरांनी ना बदला घेतला, ना कुणाला बदला घेउ दिला. काफीरांना आपल्या कृत्याचा पश्‍चाताप झाला. पैगंबरांनी आदेश दिला - कुणालाही इजा करू नका. कोणाच्याही संपत्तीची हानी होवु देवु नका. जे दुष्मन जेथे असतील तेथे सुरक्षीत आहेत. अजिबात घाबरू नका. मुस्लीमांची श्रद्धा व सत्य मार्गाचा आदर करीत शेवटी कुरैश काफीरांनी निमुटपणे आपली हार मान्य केली. घोर अन्याय करणारे, मरण यातना देणारे दुष्मण शरण आले असताना पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी सर्वांना उदार अंत:करणाने माफ केले. कसलाही रक्तपात न करताच हे युद्ध जिंकले. पैगंबरांनी काबा मधील सर्व मुर्त्या बाहेर काढल्या . काबा पवित्र झाले. संपुर्ण अरब आता शांततेचा संदेश देवु लागले. कुरैशांनीही शेवटी सत्य मार्गाचा स्विकार करून इस्लाम धर्म स्विकारला. हे सर्व पैगंबरांसमोरच घडले. मक्के वरील विजयानंतर 10 लाख वर्ग मैल पेक्षा जास्त भु भागावर पैगंबरांचे राज्य होते. संपुर्ण अरबचे ते सम्राट झाले. तरीही त्यांच्या अंगावर नेहमी फाटके तुटकेच कपडे असायचे. स्वत:च आपल्या चप्पलांची दुरूस्ती करायचे. शेळ्यांचे दुध काढणे, घरात झाडु मारणे अशा प्रकारची घरेलु कामे ते स्वत:च करत होते. या काळात सर्वच मुस्लीमांकडे भरपुर संपत्ती होती. अरबच्या या सम्राटाच्या घरची चूल मात्र अनेक दिवस पेटत ही नव्हती. केवळ खजुर आणि पाण्यावरच ते दिवस कंठवीत असत. अनेक रात्री उपाशी पोटी ते झोपत. कारण रात्री जेवणासाठी त्यांच्याकडे काही नसायचे. दिवसभर कामात व्यस्त राहुनही रात्री चांगल्या बेडवर ते कधीच झोपले नाहीत. साध्या चटईवर ते नेहमी झोपायचे व डोळ्यात सतत अश्रु असायचे. सतत प्रार्थनेत ते मग्न असत. ईश्‍वराने सोपवीलेले कार्य पुर्ण करन्याचाच विचार सदा सर्वदा त्यांच्या मनात होता. ज्या वस्रात त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. त्या वस्त्राला अनेक ठिकाणी ठीगळं पडलेली होती. ज्या घरातून संपुर्ण जगतात सत्याचा प्रकाश फैलावला तेच घर अंध:कारात होते. कारण दिवा प्रकाशित करन्याइतपत तेलही त्यांच्या कडे नव्हते. परिस्थीती बदलली तरी पैगंबर कधी बदलले नाहीत. प्रत्रेक वेळी ते तेवढेच स्थिर होते. जगातील कोणताच सम्राट त्यांच्या इतका साधा व सच्चा नव्हता. आणि त्या समान कोणीच होवु शकत नाही. वयाच्या 63 व्या वर्षी मोहंमद पैगंबर(सल्ल.) स्वर्गस्थ झाले. मृत्युसमयी त्यांनी सांगीतले की मी ईश्‍वराचा संदेश तुम्हा सर्वांपर्यंत पाहोचवीला, आता या पुढे तो तुम्हीच इतरापर्यंत पोहचवा. कारण यापुढे कयामत पर्यंत क ोणीही पैगंबर येणार नाही. या सत्य मार्गाचा प्रसार करन्याची जबाबदारी प्रत्येक मुस्लीमांवर सोपवन्यात आलेली आहे. मृत्यू येण्या आधीच मरणोपरांत जिवनाची तयारी करणे आवश्यक आहे. आणि ही तयारी म्हणजेच अल्लाहची ( परमात्म्याची ) मनोभावे आराधना व स्वच्छ आचरण, पुन्य कर्मे करणे होय . इस्लाम धर्म व पवीत्र कु रआन समजुन घेन्याआधी पैगंबरांचे जिवन चरित्र समजने आवश्यक आहे. पवित्र कुरआन व पैगंबरांचे संदेश संपुर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहेत. पैगंबरांचे जीवन हे एका खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. पैगंबरांनी आदर्श जीवन जगण्याचे काही नियम घालुन दिले आहेत . त्या नियमाप्रमाणे जीवन जगणारा सच्चा मुस्लीम आहे. इस्लाम हा शांततेचा पुरस्कर्ता आहे. इस्लाम मध्ये दहशतवादाला अजिबात थारा नाही. कुरआन मध्ये म्हटले आहे - ज्याने एखाद्या निरापराध व्यक्तीची हत्या केली त्याने समस्त मानव जातीची हत्या केली. 
(समाप्त)