Breaking News

खंजिरी किर्तन महोत्सव महत्वाची भूमिका बजाविणार : काळे


कोपरगाव :  ग्रामीण भागातील तरुणांची शहराकडे वाढती ओढ चिंताजनक असून भविष्यात खेडी ओस पडतात की काय, अशी भिती वाटत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी खंजिरी किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खंजिरी कीर्तन महोत्सव ग्रामीण भागाच्या उद्धारासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे, असे प्रतिपादन प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी केले.

राहाता तालुक्यातील शिंगवे येथे प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांच्या धार्मिक व सामाजिक विचारातून माजी खा. कर्मवीर शंकरराव काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रणित प्रबोधनपर राष्ट्रीय खंजिरी कीर्तन सोहळा पार पडला. राहाता तालुक्यातील वाकडी, पुणतांबा, चितळी, शिंगवे आदी ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम गुरुकुंज, अमरावती येथील राष्ट्रीय कीर्तनकार विनोद सम्राट ह. भ. प. नारायणदास पडोळे महाराज यांच्या प्रबोधनपर खंजिरी किर्तनरुपी सेवेचे समारोपीय कीर्तन शिंगवे येथे मोठ्या उत्साहात पार पडले. याप्रसंगी पुष्पाताई काळे बोलत होत्या. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यावेळी उपस्थित होते. पुणतांबा येथील मुक्ताई ज्ञानपीठाचे मठाधिपती ह. भ. प. रामानंदगिरी महाराज, हरिहर गोविंद महाराज आश्रम शिंगवेचे ह. भ. प. आचार्य भगवान महाराज शास्त्री, दादासाहेब उगले, तुकाराम महाराज धनवटे, शिंगवे सोसायटीचे चेअरमन अशोकराव चौधरी, शिंगवेचे सरपंच हरिभाऊ पगारे, बाबासाहेब उगले, राजेंद्र धनवटे, ज्ञानदेव साळुंके, पोपट थोरात, बाळकृष्ण वहाडणे, अहिलाजी जाधव, दीपक गायकवाड, पद्माकर सुराळकर, भास्करराव चौधरी, मच्छिंद्र चौधरी, पोपट चौधरी, भाऊसाहेब लासुरे, प्रमोद चौधरी, विनायक बर्गे, बाळासाहेब बाभूळके, जनार्दन बर्गे, विठ्ठलराव चौधरी, चांगदेव पठारे, पुणतांब्याचे माजी सरपंच मुरलीधर थोरात, राहुल धनवटे, सुभाष कुलकर्णी, बाबासाहेब चव्हाण,विष्णू डोखे, ताराचंद पेटकर, प्रभाकर शेंडगे, पंढरीनाथ उदावंत, शांतीलाल भाटी, अशोकराव बोरबने, अनिल पेटकर, भीमा धनवटे, अरुण बाबरे, रामकृष्ण चव्हाण, शैलेन्द्र कुलकर्णी, अप्पासाहेब वहाडणे, अनिल मोरे, अशोकराव धनवटे आदींसह ग्रामस्थ विशेषत: महिला याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.