Breaking News

कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा भारदे पुरस्काराने सन्मानित


राहुरी तालुका प्रतिनिधी -

पद्मभूषण बाळासाहेब भारदे प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा देशभक्त बाळासाहेब भारदे स्मृती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांना पुणे येथे सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते नुकताच देण्यात आला.

याप्रसंगी त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, आमदार बच्चू कडू, आ. पाशा पटेल, भारदे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अजय भारदे आदी उपस्थित होते. शिक्षण, संशोधन, विस्तार व प्रशासन या क्षेत्रात केलेल्या अभूतपर्व कार्याबद्दल डॉ. विश्वनाथ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण, संशोधन, विस्तार व प्रशासन या क्षेत्राचा त्यांना व्यापक अनुभव आहे. त्यांचे १०० हून अधिक शास्त्रीय लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी विविध पिकांचे वाण विकसित केले आहेत. त्यांच्या कृषि क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना विविध राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी रूजू झाल्यापासून त्यांनी कृषि विद्यापीठाच्या स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले. 

विद्यापीठ कार्यक्षेत्रात एक महिन्यात ६० हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. क्लिन, ग्रीन आणि स्मार्ट युनिव्हर्सिटी ही संकल्पना त्यांनी मांडली. विद्यापीठ प्रशासन त्यांनी अधिक पारदर्शक केले आहे. या पुरस्काराबद्दल विद्यापीठ परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.