Breaking News

देवस्थान ट्रस्टने पंचक्रोशीचा सर्वांगिण विकास साधावा - डॉ. जयवंत अवघडे

सातारा, दि. 27, जून - ग्रामविकासाची चळवळ ही सामाजिक एकोप्यावर चालत असते. असा एकोपा निर्माण करणारे धार्मिक ठिकाण म्हणून सेवागिरी देवस्थान ट्रस्टचा नावलौकीक आहे. आपल्या लौकिकाला साजेसे काम करणाऱया देवस्थान ट्रस्टने पुसेगांव पंचक्रोशीचा सर्वांगिण विकास साधावा, असे आवाहन फर्ग्यूसन महाविद्यालयाचे रजिस्टार डॉ. जयवंत अवघडे यांनी केले. 

पुणे येथील फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या रजिस्टार पदावर कार्यरत असणाऱया डॉ. जयवंत अवघडे यांचा देवस्थान ट्रस्टच्यावतीने डॉ. सुरेश जाधव यांच्या हस्ते आणि कटगूण ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
डॉ. अवघडे पुढे म्हणाले, एकीचे महत्त्व काय असते ते कटगुणकरांना समजल्याने पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत अवघा गाव एक झाला. राजकारणविरहित स्पर्धा झाल्याने कटगुणला क ोटयावधी लिटर पाण्याचासाठा तयार झाला. देवस्थान ट्रस्टने सामाजिक विकासकामांची योजना तयार करुन त्यादृष्टीने प्रयत्न करावेत व पंचक्रोशीमधील सर्व ग्रामस्थ एकत्र करुन सामुहिक विकास साधावा.