Breaking News

‘प्रवरा’च्या स्किल डेव्हलपमेंट कोर्सच्या फायदा घ्यावा : डॉ. कोल्हे

प्रवरानगर प्रतिनिधी : लोकसंख्या जशी-जशी वाढत जाईल, त्या प्रमाणात वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या अन्नाची मागणी वाढत जाणार आहे. त्यामुळे भारतामध्ये फुड इंड्रस्टीला खूपच महत्व येणार आहे. म्हणूनच अशा कंपन्यांमध्ये रोजगारसुध्दा वाढणार असून तांत्रिक कौशल्य असलेल्या तरुणांना खूप संधी आहे. या पार्श्वभूमीवर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने प्रवरा केअरच्या माध्यमातून सुरु केलेल्या मोफत स्किल डेव्हलपमेंट कोर्सच्या फायदा घ्यावा, असे आवाहन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी केले. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी सलग्न महाविद्यालयांच्यावतीने सगुणा फुड प्रायव्हेट लि. कंपनीने आयोजित केलेल्या मेगा भरती मेळाव्याचे उदघाटन करताना डॉ. कोल्हे बोलत होते. याप्रसंगी सगुणा फुड प्रायव्हेट लि. कंपनीचे एच. आर. मॅनेजर नामदेव दुकाळे, डॉ. संदीप गवळी, विश्वनाथ पाटील, शरद जाधव, राजेंद्र गोरे, पायरेन्स एम. बी. ए. चे संचालक डॉ. दास, स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे संचालक डॉ. संपतराव वाळुंज, समन्वयक प्रा. धनंजय आहेर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन गोंदकर आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी प्रा. रमेश जाधव यांनी प्रास्तविक केले.