Breaking News

अग्रलेख - विकासाच्या नावाने बोंबाबोंबउत्तरप्रदेशमध्ये

भाजपाला एकहाती सत्ता देऊन बर्‍याच महिन्यांचा कालावधी लोटला असला, तरी योगी आदित्यनाथ यांचा कारभार संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे. उत्तरप्रदेशमध्ये क ायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहे, गोरखपूर, फुलपूर, कैराना या मतदारसंघातील लोकसभेच्या पोटनिवडणूकांत भाजपाचा पराभव झालेला आहे, तरी योगी आदित्यनाथ आपल्या क ारभारात सुधारणा करण्याऐवजी हवेत इमले बांधण्याचे स्वप्न मात्र रंगवतांना दिसून येत आहे. विशेष म्हणजे योगी आदित्यनाथ भगवे वस्त्र धारण करत असल्यामुळे, या रंगात त्यागाचे महत्व अधोरेखित होते. मात्र योगी आदित्यनाथ यांची कृती याउलट असल्याचे दिसून येत आहे. योगी आदित्यनाथ यांना स्व प्रसिध्दीचा हव्यास लागला असून, त्यांनी भाजपच्या सर्व कार्यालयांमध्ये स्वता:च्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूर्ती ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या मोदी आणि योगी यांच्या मूर्ती अगदी खास पद्धतीने चित्रकूटच्या एका कलावंताने बनवल्या आहेत. विक ासकामाच्या नावाने बोंबाबोब असतांना, केवळ स्वता:च्या मूर्ती उत्तरप्रदेशात मिरवणे हा केवळ प्रसिध्दीचा स्टंट आहे.

5 जून रोजी योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस साजरा केला गेला. त्यावेळी त्यांना भेट देण्यात आलेल्या दोन मूर्तींचीही जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातील एक मूर्ती उत्तर प्रदेशातील शक्ति शाली भाजप नेते म्हणून ओळख असलेल्या सुनील बन्सल यांनी दिली, तर दुसरी मूर्ती योगी आदित्यनाथ यांचे ओएसडी अभिषेक कौशिक यांनी दिली.
भगवे कपडे परिधान केलेली योगींची मूर्ती दस्तुरखुद्द योगी यांनासुद्धा प्रचंड आवडल्याचे समजते आहे. तिथे उपस्थित असलेल्या इतर नेत्यांनाही या मूर्तींची प्रचंड स्तुती केली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच आदेश जारी करण्यात आला की, उत्तर प्रदेशातील भाजपच्या सर्व कार्यालयांमध्ये योगी आणि मोदी यांच्या मूर्ती ठेवल्या जातील. उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये तर भाजपचे चार-चार-पाच-पाच कार्यलये आहेत. बहूजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी देखील असेच सामाजिक सभागृहात काशीराम आणि स्वतचे पुतळे उभारले होते. या सभागृहांचा उपयोग आजजरी सामाजिक कामासाठी होत असला, तरी मायावती यांच्या पुतळयांचे उदात्तीकरण त्यांची सत्ता संपुष्टात आणण्यास पुरेसे ठरले होते. असाच काहीसा प्रकार योगी आदित्यनाथ यांच्या सोबत देखील होवू शकतो. कारण आज उत्तरप्रदेशातील कायदा व सुव्यवस्था संपूर्ण धोक्यात आलेली आहे. रूग्णालयातील ऑक्सिजनचे सिलेडंर संपल्यामुळेे जवळपास 100 बालकांना हक-नाक आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर उत्तदप्रदेशात गोमांसवरून झालेल्या हत्या, दलित अत्याचाराच्या घटना, हे सर्व प्रकार योगी आदित्यनाथ यांची अपयशच म्हणावे लागेल. मात्र योगी आदित्यनाथ यांनी कायदा व सुव्यवस्थेकडे कधीही गांभीर्याने बघितले नाही, उलट उत्तरप्रदेशचे राजकारण आपल्याभोवती केंद्रीत कसे राहील, असा संपूर्ण कटाक्ष योगी आदित्यनाथ यांचा होता. परिणामी विकासाची गती कायमच खालावत चालली आहे.
काही महिन्यातच लोकसभा निवडणूकांना सामौरे जाण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र उत्तरप्रदेशात 80 लोकसभा जागा असून, या जागा मिळविण्यासाठी भाजपाने कितीही कंबर कसली, तरी याठिकाणी भाजपला जोरदार फटका बसणार आहे, कारण योगी आदित्यनाथ यांचा स्वकेंद्रीत कारभार भाजपचा पीछेहाटीचे प्रमुख कारण असणार आहे.