पालिका स्थायीची पाच कोटीच्या विकासकामांना मंजुरी
पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे चार कोटी 95 लाख 96 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यात देण्यात आली.सन 2017-18 या आर्थिक वर्षात इयत्ता 10 वी मधील 80 % पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या मात्र कागदपत्रा अभावी अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी कागदपत्राची पूर्तता करुन पात्र ठरलेल्या 274 विद्यार्थांना बक्षीसपर रक्कम देण्यासाठी येणा-या सुमारे 32 लाख 45 हजार रुपयांच्या खर्चास, प्रभाग क्रमांक 8 इंद्रायणीनगर मध्ये ठिकठिकाणी चौकांमध्ये म्युरल्स बसविणे व सुशोभिकरणाची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 58 लाख 10 हजार रुपयांच्या, पाणीपुरवठा विभागाकडील कवडेनगर, काटेपुरम इत्यादी परिसरातील जुने पाईपलाईन बदलुन नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी येणा-या सुमारे 27 लाख 38 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
