‘सेंट जॉन’च्या विद्यार्थ्यांच्या कष्टाचे श्रेय शिक्षक आणि पालकांना : डेनिस
राहाता प्रतिनिधी
येथील सेंट जॉन्स स्कुलचे विद्यार्थी दरवर्षी तालुक्यात चांगले गुण मिळवून यश संपादन करतात. यामुळे संस्थेचा नावलौकिक वाढतो. मात्र याचे श्रेय येथील शिक्षकांबरोबर त्यांच्या पालकांनाही जाते, असे गौरवोद्गार सेंट जॉन स्कुलचे मॅनेजर फादर गिलबर्ट डेनिस यांनी काढले.
राहाता येथील सेंट जॉन्स इंग्लिश मिडीअम स्कुल या स्कुलमध्ये दहावीमध्ये चांगले गुण मिळविलेल्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांचा सन्मान, प्राचार्य फादर गिलबर्ट डेनिस यांची स्कुलच्या मॅनेजरपदी नियुक्ती आणि फादर पॉली डिसुझा यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली. त्याबद्दल या सर्व मान्यवरांचा राहाता प्रेस क्लबच्यावतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना मॅनेजर गिलबर्ट डेनिस म्हणाले, येथील विद्यार्थी दरवर्षी चांगल्या क्रमांकाने गुण मिळवित आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळते. आठवीपासूनच विद्यार्थ्यांकडून दहावीच्या परिक्षेची चांगल्या प्रकारे तयारी करुन घेतली जाते. त्यांना प्रसिध्दीमध्ये आणण्याचे काम आपण करता आहात. हा एक चांगला उपक्रम शहरातील प्रेस क्लब राबवित आहे.
यावेळी सेंट जॉन स्कुलचे नुतन प्राचार्य पॉली डिसिल्व्हा यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक रविंद्र गायकवाड यांनी राहाता प्रेस क्लब राबवित असलेल्या विविध प्रकारच्या उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्य पॉली डिसिल्व्हा यांची प्राचार्य म्हणून निवड झाल्याबद्दल व गिलबर्ट डेनिस यांची मॅनेजर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, उपाध्यक्ष दिलीप खरात आणि सर्व सदस्यांनी त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी पालक संजय सदाफळ, विद्यार्थी समृध्दी गाडेकर, राहाता प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, प्रेस क्लब सदस्य किरण वाबळे, सुनिल करमासे यांनी मनोगत व्यक्त मार्गदर्शन केले. शिक्षक सतीष वाघमारे, अमित कोळगे, शरद गायकवाड यांनी प्रास्ताविक करत आभार मानले.