Breaking News

कल्याणी लोखंडे यांनी केली नुकसानीची पहाणी अन् सामाजिक बांधिलकी जोपासत केली आर्थिक मदत

श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी येथे वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने अनेक ग्र्रामस्थांच्या झालेल्या नुकसानीची नुकतीच पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे यांनी पाहणी करुन सामाजिक बांधिलकी जोपासत आर्थिक मदतही केली.

चार-पाच दिवसांपूर्वी निंबवी (ता. श्रीगोंदा) आणि परिसरात वादळी वार्‍यासह गारांचा पाऊस झाला. निंबवी येथे मात्र चक्रीवादळानेच अनेकांचे आतोनात नूकसान झाले. वारा घरात घुसून घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले. जनावरांचे गोठे, कोंबडयांच्या पोल्ट्री फार्मचेही नूकसान झाले. बाजार भावाअभावी शेतात साठवूण ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नूकसानही झाले आहे. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचे नूकसान झाले आहे. तलाठी पोपट उचाळे यांनी सर्व ठिकाणचे पंचनामे केले आहेत.
पं.स. सदस्या कल्याणी लोखंडे यांनी प्रत्यक्ष भेट घेत घरावरील पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडलेल्या रामदास शिर्के, अ‍ॅड. राजेंद्र शिर्के, दीपक शिर्के, महादेव शिर्के, निलेश पंडीत यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करताना त्यांच्या कुटुंबांशी चर्चा केली. तसेच जमीर शेख यांच्या घरातील जखमी झालेल्या महिलांचीही आस्थेने विचारपूस केली. यावेळी नुकसान झालेल्या सर्व कुटुंबाना आधार देताना प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत करत सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी सरपंच सुरेखा शिर्के, उपसरपंच ठकसेन शिर्के यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.