Breaking News

महाबळेश्‍वर येथे 99 वे अखिल भारतीय मराठी नाटय संमेलनाची तयारी सुरु

सातारा, दि. 24, जून - मुंबई येथील मुलुंड 60 तास 98 वे अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन मोठ्या उत्साहात पार पडल्या नंतर आता 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन महाबळेश्‍वर येथे भरविण्याची तयारी येथील नाट्य परिषदेच्या शाखेने केली असुन तसा प्रस्ताव अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचेकडे दिला आहे. यावेळी नाट्य प रिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गिरीश ओक व प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे हे उपस्थित होते अशी माहिती येथील नाट्य परिषदेच्या शाखेचे अध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी दिली. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुका पार पडल्या नंतर नविन पदाधिकारी यांनी परिषदेचा कार्यभार स्विकारला होता या नुतन पदाधिकारी यांचेकडे 98 वे नाटय संमेलन महाबळेश्‍वर येथे भरविण्यात यावे यासाठी प्रस्ताव दिला होता नियामक मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली व नाटय संमेलनासाठी जवळ जवळ महाबळेश्‍वरची निवड निश्‍चित झाली होती. परंतु नाट्य परिषदेच्या तारखा महाबळेश्‍वर शाखेला गैरसोयीच्या वाटल्याने महाबळेश्‍वर शाखेने जुन मध्ये संमेलन भरविण्या बाबत असमर्थता व्यक्त केली त्या नंतर परिषदेने 98 वे संमेलन हे मुंबईत भरविण्याचा निर्णय घेतला अखिल भारतीय नाट्य प रिषदेचे 98 वे नाटय संमेलन नुकतेच मुलुंड, मुंबई येथे उत्साहपुर्ण वातावरणात पार पडले. याच वेळी नाट्य संमेलन महाबळेश्‍वर येथे भरविण्याची मागणी करणारा प्रस्ताव प्रसाद कांबळी यांना सादर करण्यात आला नाटय संमेलनाच्या स्थळा बाबत निर्णय घेण्यापुर्वी नाटय परिषदेचे सर्व प्रमुख पदाधिकारी हे महाबळेश्‍वर शाखेच्या पदाधिकारी यांचे बरोबर बैठक होणार आहे त्या नंतर नाटय परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी व इतर पदाधिकारी यांचे बरोबर महाबळेश्‍वर दौरया वर येणार असुन ते येथे संमेलन स्थळ निवास व्यवस्था आदीची पाहणी करणार असल्याची माहीतीही महाबळेश्‍वर शाखेचे अध्यक्ष डी एम बावळेकर यांनी दिली