Breaking News

औषध खरेदीत पालिकेचे 5 कोटी वाचणार


पुणे महापालिका औषध खरेदी करताना जो ठेकेदार जास्तीत जास्त डिस्काउंट देईल. त्याला वर्क ऑर्डर देते. मात्र जेनेरिक औषधांची खरेदी केल्यास 60 ते 70 टक्के डिस्क ाउंट मिळु शकतो. त्यानुसार पालिकेने जेनेरिक आणि ब्रँडेड या दोन प्रकारच्या औषधासाठी स्वतंत्र डिस्काउंट कोट देउन निविदा काढली आहे. त्यामुळे पालिकेचे औषध खरेदीत पाच कोटी वाचणार आहेत. गेल्यावर्षी पालिका आयुक्तांना सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर आणि विश्‍वास सहस्त्रबुध्दे यांनी विनंती केली होती .
निविदा काढताना जेनेरिक व ब्रँडेड या दोन प्रकारच्या औषधांसाठी स्वतंत्र डिस्काउंट कोट करण्यास भाग पाडावे; पालिका आयुक्तांनी ही सूचना मान्य केले आणि त्यातून गेल्या वर्षी जेनेरिक औषधांसाठी 50 टक्के तर ब्रँडेड औषधांसाठी 22 टक्के डिस्काउंट मिळाला . त्यात पालिकेची चार कोटीची बचत झाली. यंदा पालिकेने 5 कोटी रुपयांची दोन टेंडर्स काढली आहे. त्यात जेनेरिक औषधांवर 51 टक्के तर ब्रँडेड औषधांवर 23 टक्के डिस्काउंट देणारा कंत्राटदार आहे. त्यामुळे पालिकेचे पाच कोटी वाचणार आहे. त्यामुळे तेवढया किमतीची जास्त औषध पालिकेला मिळणार आहेत.