Breaking News

’सोलापूर -मिरज’ झाली सुपरफास्ट


सोलापूर - मिरज एक्सप्रेसला रेल्वे बोर्डाने सुपरफास्टचा दर्जा दिला आहे. त्यामुळे गाडीच्या क्रमांकासह गाडीच्या वेळेत बदल झाला आहे. नव्या वेळेप्रमाणे ही गाडी आता सोलापूर स्थानकावरून सकाळी सात वाजून 5 मिनिटांनी मिरजसाठी सुटेल. मिरजला 11.50 मिनिटांनी पोहचेल. गती वाढल्याने प्रवाशांचे 1 तास 20 मिनिटे वाचणार आहेत. गाडी क्रमांक 22155 ही सोलापूर स्थानकावरून सकाळी सात वाजून 5 मिनिटांनी मिरजसाठी रवाना होईल. कुर्डुवाडीला 8 वाजून 15 मिनिटांनी पोहचेल.

तर मिरजला 11 वाजून 50 मिनिटांनी पोहचेल. या गाडीची जुनी वेळ ही सकाळी सहाची होती. ही वेळ गैरसोयीची असल्याकारणाने प्रवासी व प्रवासी संघटनांनी गाडीची वेळ बदलण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. ती अखेर मान्य झाली. गाडी क्रमांक 22156 ही मिरज स्थानकावरून दुपारी 4 वाजता सुटेेल. कुर्डुवाडीला सायंकाळी सात वाजून 40 मिनिटांनी पोहचेल. तर सोलापूरला 8 वाजून 50 मिनिटांनी पोहचेल. 7 जूनपासून याची अंमलबजावणी होणार आहे.