Breaking News

अस्वच्छ करणार्‍या 253 रेल्वे प्रवाशांना 40 हजारांचा दंड

स्थानक अस्वच्छ करणार्‍या 253 प्रवाशांवर रेल्वेने कारवाई सुरू केली असून त्यांच्याकडून सुमारे 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विशेष म्हणजे यात 15 रेल्वे कर्मचार्‍यांचा समावेश आहे. स्थानक व्यवस्थापक गजानंद मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
इंडियन रेल्वे कलमनुसार रेल्वे स्थानक व परिसरात थुंकणे, सिगारेट अथवा विडी ओढणे हा दंडनीय अपराध आहे. यासाठी 500 रुपयांच्या दंडाची रकमेची तरतूद आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांकडून स्थानक परिसर घाण करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे स्थानक अस्वच्छ करणार्‍यांच्या विरोधात 25 मे पासून कारवाई मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत यात 253 जणांवर कारवाई केली आहे. यासाठी तिकीट पर्यवेक्षक व आरपीएफ यांचे पथक तयार करण्यात आले. विशेष म्हणजे 15 कर्मचार्‍यांवर कारवाई केली गेली. य ही कारवाई सातत्याने सुरूच राहील, असे मीना यांनी सांगितले.