Breaking News

महाबळेश्‍वरला पर्यटकांची तोबा गर्दी


महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्‍वरला पर्यटकांची तोबा गर्दी उसळली आहे. उन्हाळी सुट्याच्या हंगामातील शेवटच्या पंधरवडयात शाळा सुरू होण्यापूर्वी या पर्यटनस्थळी भेट दिलीच पाहिजे या हेतूने विशेषकरून मुंबई,पुणे, गुुजरातसह मध्यप्रदेश, प.बंगालमधील हजारो पर्यटक येथे दाखल झाले आहेत. सुमधूर लालचुटूक गोड स्ट्रॉबेरी,केशरी रंगाची गाजरे, पिवळयाधमक स्वीटकॉर्न मक्याच्या कणसांचा जंगली लाकडावर भाजलेला भुट्टा आणि स्वीटकॉर्न बॉईल कप तसेच जंगलातील झाडांवर जमा झालेला शुध्द मध,महाबळेश्‍वरी चपला याशिवाय स्ट्रॉबेरी टॉपिंग खाण्यासाठी पर्यटकांची सर्वच ठिकाणी तोबा गर्दी होत आहे. वेण्णालेकवर हॉर्स रायडिंग व बोटिंग करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी दिसून येते. महाबळेश्‍वर स्पेशल जाम, जेली, चॉकलेटस व  काबूली चणे खरेदीसाठी दुकाने पर्यटकांनी भरून गेली आहेत.