विदर्भातील शेतक-यांनी 25 जून पर्यंत पेरणी करू नये- हवामान खाते
नागपूर, दमदार सुरुवात केल्यानंतर विदर्भात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाच्या सातत्यात खंड पडल्यामुळे विदर्भातील शेतकर्यांना पावसासाठी 25 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भात जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला. अपेक्षित पावसापेक्षा दुप्पट पाऊस या काळात पडला. मान्सूनचे आगमनही वेळेत झाले. त्यामुळे शेतकर्यांसह सर्वसामान्यही सुखावला. अनेक भागात शेतकर्यांनी पेरण्यांना सुरूवात केली. दमदार पावसामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, आता साधारणत: 25 जूनपर्यंत पावसाचा खंड पडणार आहे. पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने कडक ऊन आणि आर्द्रतायुक्त वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे या काळात ज्या शेतकर्यांकडे सिंचनाची सोय नाही, त्यांनी पेरणी न करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. पावसाचा खंड असल्याने पिके करपण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पेरणीची घाई न करता दमदार पावसाची वाट पाहण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.