Breaking News

वडूज आगाराला उन्हाळी हंगामात 20 लाखाचा नफा

सातारा, दि. 28, जून - राज्य मार्ग परीवहन मंडळाच्या सातारा विभागातील वडूज आगाराला उन्हाळी हंगामामध्ये जादा वाहतुकीमधून 20 लाख रुपयांचा नफा मिळाला असल्याची माहिती आगार व्यवस्थापक व्ही. डी. माने यांनी दिली.एप्रिल ते जून अखेर या तीन महिन्यात प्रवाशी गर्दीचा फायदा घेण्यासाठी वडूज आगाराने पुणे-मुंबई मार्गावर जादा वाहतुकीचे नियोजन केले होते. या मार्गावरील फेर्या वाढविल्यामुळे चालू वर्षी 38 लाख 53 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील वर्षाची तुलना करता हे उत्पन्न 20 लाख 71 हजार रुपयांनी वाढले आहे. उत्पन्न वाढीसाठी विभाग नियंत्रक श्री. पळसूले, स्थानक प्रमुख एस. एस. वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आगारातील सर्व चालक, वाहक, यांत्रिकी विभाग व प्रशासकीय कर्मचार्यांनी चांगले नियोजन करण्याबरोबर अथक प रिश्रम घेतल्यानेच वाढीव नफा झाल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.