Breaking News

निरक्षर समाजाचा नेता शहाणा असावा लागतो : ढोबळे


शिर्डी : ‘मातंग ग्रुप डेव्हलपमेंट’ने मातंग समाजावर उपकार केले आहेत. कारण आमच्यासारख्या समाजातील पुढाऱ्यांना व नेत्यांना समाजाची एक मोट बांधता आली नाही. ती बांधण्याचे काम व एकजूट करण्याचे काम तुमच्यासारख्या कर्मचाऱ्यांनी करून दाखविले. त्यामुळेच निरक्षर समाजाचा नेता शहाणा असावा लागतो, असे प्रतिपादन माजीमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी केले. 
शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या मातंग समाजाच्या अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमजीडी ग्रुपचे संस्थापक सुनील वारे होते. या अधिवेशनाला माजीमंत्री रमेश बागवे, सुनील वारे, डॉ. सुभाष आवळे, सुभाष जगताप, बाबुराव मूर्थीधोर्डे, रमेश बोतल, अनिल खुडे, हनुमंत तगनोर, डॉ. माधव गांधेकर, मोहनराव खुडे, अरविंद काळोखे, सागर रंधवे, शंकर तडाखे, चंद्रकांत काळोखे आदींसह विविध राज्यातून आलेले मातंग समाजातील डॉक्टर, वकील, अभियंते आदींसह शासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दरम्यान, या अधिवेशनात महिलांच्यावतीने राजश्री कसबे-साठे, वैशाली थोरात, रमेश तुपे, रेखा बोडखे, मोनाली चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले. या मातंग अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री सुनील वारे, संजय शिर्डीकर, भारत पवार, नितीन दिनकर, अभिजित पवार, अरुण बाबरे, बंडू शिंदे, संजय आरणे, नितीन साबळे, शिवा कांबळे, मंगेश त्रिभुवन, राजेंद्र त्रिभुवन आदींनी पुढाकार घेतला. अधिवेशनाचा समारोप राज्यमंत्री मधुकरराव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.