Breaking News

उंटांनी सोडविली ‘त्यांच्या’ ‘रोजीरोटी’ची अडचण


शिर्डी : साईशताब्दीच्या निमित्ताने शिर्डीत मोठी गर्दी होईल, दोन पैसे पोटाला मिळतील, यासाठी राज्यस्थानची ओळख असलेले उंट घेऊन शिर्डीत २५ कुटुंब आले आहेत. साईभक्तांना उंटावरून फिरून कुटुंबातील प्रमुख सदस्य साईनगरीतील मुख्य रस्त्यांवर फिरवून पैसे कमवित आहेत. गेल्या ८ महिन्यांपासून जवळपास ५० उंटासह हे कुटुंब फिरत आहे. या उंटांनी या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची मुख्य अडचण सोडविल्याने ही मंडळी आनंदात आहेत. दरम्यान,  या लोकांना दिवसभर फिरून ५०० ते ६०० रुपये मिळत आहे. मात्र ज्या दिवशी भाविकांची गर्दी नसते, त्यावेळी या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. उंटाला पावसाळ्यात पाणी लागत नाही. मात्र उन्हाळ्यात प्रतिदिवस ६० लिटर पाणी लागते. ३ हजार लिटर पाणी उंटांना पाजण्यासाठी होणारी धावपळ या कुटुंबाची वाताहत दाखविते. 
शिर्डी हे तीर्थक्षेत्र असल्याने सायंकाळच्या वेळी भक्तांच्या मुलांना त्यावर बसून त्यातून दिवसभरात आम्ही ४०० ते ५०० रु. कमवतो. समाजातील लोक महानगराच्या ठिकाणी राहतात. आमची मुले शिक्षणापासून दूर असली तरी आमची ३ पिढी मात्र शिक्षणाच्या प्रवाहात आली आहे. त्यामागे शिक्षकांनी केलेले प्रबोधन निमगाव-

कोऱ्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच शिल्पा कैलास कातोरे उपसरपंच अजय सोपानराव जगताप व सर्व सदस्यांचे व ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे आम्ही या गावातील मोकळ्या जागेत राहतो मात्र शासनाचे दुर्लक्ष पोटासाठी होणारे स्थलांतर शासकीय योजनेपासून समाज वंचित असून आता भटकंती न करता एकाच ठिकाणी थांबून पोटासाठी हा व्यवसाय करताना ३ पिढीला मात्र शिक्षणाच्या प्रवाहातआणण्यासाठी आमचा पाठपुरावा चालू असून २ वेळेचे जेवण व राहण्याचा प्रश्न सहजपणे या परिसरात सुटला अपेक्षा फार काही नसल्याने जवळपास १०० सदस्यांचे हे कुटुंब केल्या १० महिन्यापासून वास्तव्य करून आहे.