Breaking News

‘प्रवरा’च्या महाविद्यालयाला मान्यतावाढ


प्रवरानगर : प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्मसी) चिंचोली या महाविद्यालयाला फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवीदिल्ली या संस्थेने तीन वर्षांसाठी मान्यतावाढ केली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. विजय तांबे यांनी दिली. 
मार्च २०१८ मध्ये फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया नवीदिल्ली यांच्या कमिटीने कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्मसी) चिंचोली या महाविद्यालयाला भेट देऊन येथील शैक्षणिक सुविधांची पाहणी केली. या कमिटीने नुकतेच महाविद्यालयाला तीन वर्षासाठी मान्यतावाढ केली असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल विरोधी पक्षनेते व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे, प्रवरा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, संस्थेचे महासंचालक डॉ. सर्जेराव निमसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, सहसचिव भारत घोगरे आदींनी अभिनंदन केले आहे.