Breaking News

चोर्‍यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश चार चोरटे गजाआड; नऊ तोळे सोनं हस्तगत, चार दिवस पोलिस कोठडी

माजलगाव, (प्रतिनिधी): गेल्या दोन ते अड्डीच महिन्यांपासून शहर सह तालुक्यातील काही गावात एक दोन दिवसाच्या फरकाने चोर्यांचे सत्र सुरू होते पण एकाही चोरी चा तपास क रणे पोलिस प्रशासना पुढे आव्हान होते पण हे आव्हान पेलत छडा लावून 4चोरट्यांना गजाआड करण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत.
उपरोक्त नमूद केल्या प्रमाणे चोरीच्या घटना घडल्या होत्या त्याचा तातडीने तपास लावून जनतेच्या मनातील दहशत नाहिशी करण्यात यावी म्हणून बीड जिल्हा पो.अ.जी.श्रीधर, अप्पर जि.पो.अ.बोर्हाडे यांनी माजलगाव उपविभाला आदेश दिले होते.

यावरून माजलगाव च्या विभागीय स.जि.पो.अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी त्यांच्या विभागातील पो.अधिक यांच्या बैठकीत पो.उप.नि. विकास दांडे यांच्या नेत ृत्वाखाली विशेष पथक तयार केले. यापथकातील दांडे सह पो.काँ.अनिल भालेराव, विजय घोडके, अमोल सोनवणे, गादेवार, जान्टी कांबळे यांनी सारखी गस्त वाढवून संबंधित फु टेज तपासून प्रकरणातील संयशयीत दगड्या अभिमान गायसमुद्रे यास ताब्यात घेऊन कसुन चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली आणि यावर त्याचा साथीदार दिपक यादव क ांबळे लाही ताब्यात घेतले होते दोघांनी घटनास्थळाची माहितीदेऊन शहरात चार ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
तालुक्यातील मंजरथ, लहामेवाडी, शेलगावथडी याठिकाणीही चोर्या होवून रोख रक्कमे सह सोन्या,चांदीच्या दागिन्यांची लुट झाली होती. याचा तपास स्थागुअ.शाखा,बीड पथकाचे स.पो.नि.दिपक तेजवकर, पो.काँ. मुंजाबा कुव्हारे, विकास वाघमारे, चव्हाण, रुपनर, यांनी टालेवाडी येथून विनोद प्रल्हाद चव्हाण ,लंबर प्रल्हाद चव्हाण दोन्ही रा.सावरगाव, ता.माजलगाव यांना अटक केली असता त्यांच्या कडून चोरीतील 9तोळे सोनं हस्तगत केले आहे. वरील चारही आरोपींना माजलगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते.न्यायालयाने 29मे मंगळवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
--------------------------------