ताराचंद गागरे यांना पुरस्कार
राहुरी : तालुक्यातील तांभेरे येथील माजी सैनिक ताराचंद चंद्रभान गागरे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मुंबई दुरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीच्यावतीने दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. दि. ८ जून रोजी मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.
