Breaking News

गोहत्येच्या संशयावरून जमावाकडून एकाची हत्या

सतना - गोहत्येच्या संशयावरून हाणामारी आणि हत्येची पुन्हा एक घटना समोर आली आहे. सांगण्यात येते, की सतनाच्या अमगार गावात गोवंशाची हत्या केल्याच्या संशयावरून जमावाने दोन जणांना बेदम मारहाण केली. घटनेच्यावेळी एका व्यक्तीचा हाणामारीच्यावेळीच मृत्यू झाला. कर एकजण गंभीररित्या जखमी आहे. चोकशीदरम्यान पोलिसांना एका प ॅकेटमध्ये बैलाचे मांस आढळून आले. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश हिंगांकर यांनी सांगितले, की याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. घटनेनंतर सतना येथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रविवारीच गृहमंत्री राजनाथ सिंह हे सतना दौर्‍यावर येत आहेत.