Breaking News

भारतीय महिला दुसऱ्या विजेतेपदासाठी सज्ज!

येत्या १३ मेपासून एशियन चॅम्पियन्स ट्राॅफी हाॅकी स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ बुधवारी काेरिया येथे रवाना झाला. ही स्पर्धा काेरियातील डाेंगहाए येथे अायाेजित करण्यात अाली. सुपरस्टार डिफेंडर सुनीता लाक्राच्या नेतृत्वाखाली भारतीय महिलांचा हाॅकी संघ या स्पर्धेत अापले काैशल्य पणास लावणार अाहे. भारतीय संघ दुसऱ्या किताबावर नाव काेरण्याच्या इराद्याने या स्पर्धेत खेळणार अाहे. 

भारताच्या महिलांनी २०१६ मध्ये एशियन चॅम्पियन्स ट्राॅफी पटकावली हाेती. अाता दाेन वर्षांनंतर पुन्हा हे साेनेरी यश संपादन करण्याचा भारतीय महिलांचा प्रयत्न असेल. अनुभवी कर्णधार राणी रामपालच्या अनुपस्थितीमध्ये संघाच्या नेतृत्वाची धुरा सुनीताकडे साेपवण्यात अाली अाहे. या स्पर्धेत भारतासह यजमान काेरिया, जपान, चीन अाणि मलेशिया महिला संघांचा समावेश अाहे.