Breaking News

राक्षसवाडी, जलालपुर येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन

कुळधरण / प्रतिनिधी । कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक तसेच जलालपुर येथे जलसंधारण पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कुळधरण गटातील भाजपाचे जेष्ठ नेते शांतीलाल कोपनर तसेच संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष धनराज कोपनर यांच्या प्रयत्नातुन प्रा. राम शिंदे यांनी या कामांसाठी निधी मंजूर केला. त्या कामांचे शनिवारी सायंकाळी भूमिपूजन झाले.


राक्षसवाडी येथे तीन तर जलालपुर येथील काळेवस्ती येथे एक अशा मंजुर असलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यांचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी विधिवत भूमिपूजन केले. यावेळी बोलताना पालकमंत्री शिंदे यांनी राक्षसवाडी येथे पानी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेसाठी सुरु असलेल्या कामाचे कौतुक केले.राक्षसवाडी गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट करित शांतीलाल कोपनर यांच्या पाठपुराव्यामुळेच ही कामे होत असल्याचे सांगितले. शांतीलाल कोपनर यांनी गावातील विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल पालकमंत्री शिंदे यांचे गावाच्या वतीने ऋण व्यक्त केले.पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासकामे मार्गी लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलेे.
या कार्यक्रमासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, शांतीलाल कोपनर, दिनकर कोपनर, सरपंच अश्‍विनी भवाळ, उपसरपंच पदम बाराते, पाराजी कोपनर, डॉ. सुनील गावडे, डॉ. मधुकर कोपनर, सुदर्शन कोपनर, तहसिलदार किरण सावंत, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, अभियंता वाबळे, विजय देवकाते, संदिप भवाळ, धनंजय हगारे, विलास जांभळकर, अल्ताफ शेख, लालासाहेब महारनवर, लक्ष्मण कोपनर, बापू कोपनर, राजु शिंदे, बबन शिंदे, किसन शिंदे, बाळु सोलनकर, विजय माने, राजेंद्र कोपनर, महादेव कोकरे, भारत माने, मुरलीधर वाघमोडे, बबन पंडित, सुनिल पंडित, किरण पंडित, सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब शिपकुले यांनी तर, डॉ. मधुकर कोपनर यांनी आभार मानले.