मोटार बाईक ॲम्ब्युलन्स सेवेचा विस्तार; नव्या २० मोटार बाईकचे लोकार्पण
सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्य विभागाच्या ‘शिव आरोग्य योजना व आपत्कालीन वैद्यकीय सेवे’अंतर्गत २ ऑगस्ट २०१७ पासून मोटार बाईक ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईत १० बाईक ॲम्ब्युलन्स सुरू करण्यात आल्या होत्या. आता या सेवेत आज आणखी वीस बाईक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. या बाईक ॲम्ब्युलन्स मुंबईसह पुणे, ठाणे, अमरावती, पालघर,नंदुरबार या ठिकाणी सेवा देणार आहेत.
