Breaking News

तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी घुमरे

जामखेड तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. एन. के. घुमरे तर सचिवपदी अ‍ॅड. सुभाष जायभाय यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होऊन अ‍ॅड. ए.ए. शेख विजयी झाले. 
जामखेड तालुका वकील संघाची सन 2018 - 19 वर्षाच्या कार्यकारिणीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. पी.के राऊत होते. तर सहायक म्हणून अ‍ॅड. सचिन पवार होते. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. एन. के. घुमरे व सचिव पदासाठी अ‍ॅड. सुभाष जायभाय यांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली. तर उपाध्यक्षपदासाठी अ‍ॅड. ए.ए. शेख, अ‍ॅड. बंडू ढाळे व अ‍ॅड. कारंडे या तिघांचे अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे निवडणूक होऊन अ‍ॅड. ए. ए. शेख यांना 16, अ‍ॅड. बंडू ढाळे यांना 16 तर अ‍ॅड. कारंडे यांना 12 मते पडली. समान मते पडलेल्या अ‍ॅड. शेख व ढाळे यांनी पाच पाच महीने कार्यकाळ वाटून घ्यायचा ठरवला व प्रथम उपाध्यक्ष कोण होणार याकरिता चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये अ‍ॅड. शेख यांची चिठ्ठी निघाली त्यामुळे सुरुवातीच्या पाच महिन्यांसाठी अ‍ॅड. शेख अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. 
यावेळी अ‍ॅड. विष्णुपंत मुरूमकर, अ‍ॅड. एस.आर. झरकर, अ‍ॅड. एन.एल. बोरा, अ‍ॅड. आर.ई. काळे, अ‍ॅड. हर्षल डोके, अ‍ॅड. के.एम. पवार, अ‍ॅड. प्रवीण सानप, अ‍ॅड. अल्लाउद्दीन शेख, अ‍ॅड. कालीदास पवार, अ‍ॅड. चंद्रकांत ढाळे, अ‍ॅड. जयप्रकाश कोल्हे, अ‍ॅड. विश्‍वास निकम, अ‍ॅड. संग्राम पोले, अ‍ॅड. प्रदीप बोलभट, अ‍ॅड. एस. नागरगोजे, अ‍ॅड. विशाल ढाळे, अ‍ॅड. कारंडे आदी सदस्य उपस्थित होते.