Breaking News

सीएसएमटी येथे सोलापूर एक्स्प्रेसच्या एसी डब्यांना आग

मुंबई - छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनस (सीएसएमटी)जवळील कारशेडमध्ये उभ्या असलेल्या एक्स्प्रेसच्या काही डब्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. यात सोलापूर एक्स्प्रेस गाडीच्या एसी डब्याचेही नुकसान झाले आहे. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी अग्निशामक दलाने दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. सीएसएमटी मेन लाइन प्लॅटफॉर्म क्र. 10/11च्या पुढे यार्डात 2 वाजून 50 मिनिटांच्या दरम्यान स्लीपर कोचला अचानक आग लागली. यात संबंधित गाडीचा डबा तसेच सोलापूर एक्स्प्रेस गाडीच्या एसी डब्याची हानी झाली आहे. फोर्ट व इंदिरा डॉकच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होत आग विझवली. दरम्यान, पोलीस तसेच आरपीएफचा बंदोबस्त सीएसएमटीमध्ये तैनात करण्यात आला आहे.