राजधानीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त शपथ
नवी दिल्ली : देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांची २७ वी पुण्यतिथी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन’ म्हणून सोमवारी महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कोपरनिकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव तथा निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. श्रीमती शुक्ला यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचा-यांना‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ’ दिली.
अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा,अजितसिंग नेगी, राजीव मलीक यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
