Breaking News

सार्थक कोल्हेच्या हृदय प्रत्यारोपणासाठी मदत करण्याचे आवाहन


सुपा : पारनेर तालुक्यातील लोणी हवेली येथील सार्थक चंद्रकांत कोल्हे हा डायलेटेड कार्डी मायपॅथी या हृदयाच्या गंभीर आजाराने त्रस्त आहे. त्या लहानग्यावर उपचार आणि इवल्याशा हृदयाचे प्रत्यारोपण करण्यासाठी फोर्टिज रुग्णालय ( मुलुंड ) येथे दाखल करण्यात आले. त्याचे हृदयाचे प्रत्यारोपण व्यवस्थीतरित्या डॉक्टरांनी केले आहे. मात्र त्यासाठी रूग्णालयातील सर्व खर्च वीस ते पंचवीस लाख रुपयांपर्यंत येण्याची शक्यता आहे. सार्थकचे वडील चंद्रकांत कोल्हे यांचे वार्षिक उत्पन्न 60 हजार रुपये असून त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे.

मागील वर्षभरापासून मुलाचे सततचे महागडे उपचार आणि औषधांच्या खर्चामुळे ते पुर्णतः हतबल झाले आहेत. मागील वर्षी दि. 13 आक्टोबर 2017 रोजी मिट्रल हॉल रिपेअर शस्त्रक्रियेसाठी 6 लाख रूपये खर्च केला आहे. त्यावेळी कोल्हे यांनी शासकीय सेवाभावी संस्था किंवा ट्रस्ट यांचेकडून मदत घेतली नाही. मात्र सार्थकचे हृदय प्रत्यारोपण करण्यात आलेल्या पंचवीस लाख रुपये खर्चासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापुढे दर महिन्यास दहा ते पंधरा हजार रुपये खर्च त्याच्या औषधासाठी येईल. तरी या चिमुकल्याच्या पुढील आयुष्याकरिता सढळ हाताने उपचारासाठी मदत करावी असे आवाहन चंद्रकांत कोल्हे यांनी केले आहे. 
मदतीसाठी चंद्रकांत अभिमन्यू कोल्हे खाते क्रमांक-32809186411, आयएफएस्सी कोड -0001129
शाखा स्टेट बँक पारनेर या खात्यावर देणगी जमा करावी. असे सार्थकचे वडील चंद्रकांत अभिमन्यू कोल्हे यांनी आर्थिक मदतीचे आवाहन दानशुर व्यक्तींना केले आहे.