Breaking News

वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय अकोट येथे स्थापन करणार

अकोट (जि. अकोला) येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास तसेच त्यासाठी आवश्यक पदांची निर्मिती करण्यासदेखील आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या न्यायालयाच्या स्थापनेमुळे अकोला व तेल्हारा या दोन्ही तालुक्यांतील नागरिकांची सोय होणार असून न्यायदानाची प्रक्रिया लोकाभिमुख व वेगवान होणार आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा या तालुक्यांसाठी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास, त्यासाठी आवश्यक पद निर्मिती करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने शासनास विनंती केली होती. त्यानुसार या दोन्ही तालुक्यांसाठी अकोट येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापनेसह या न्यायालयासाठी आवश्यक पदांची निर्मिती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.