नौदलाची तीन लढाऊ जहाजे व्हिएतनाममध्ये करणार सराव
वृत्तसंस्था | नवी दिल्ली
आग्नेय आशियातील देशांशी लष्करी संबंध वाढवण्यासाठी तसेच चीनचे वाढते प्रभुत्व लक्षात घेऊन भारत या भागातील व्हिएतनाम या महत्त्वपूर्ण देशासोबत पुढील आठवड्यात नौदलाच्या सरावात सहभागी होणार आहे.
संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पुढील महिन्यात होणाऱ्या व्हिएतनाम दौऱ्यापूर्वी दोन्ही देशांच्या नौदलांदरम्यान हा सराव होत आहे. या सरावात नौदलाची तीन लढाऊ जहाजे आणि ९०० पेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी सहभागी होत आहेत.

नौदलाचे प्रवक्ता कॅप्टन डी. के. शर्मा यांनी सांगितले की, पूर्व भागातील ताफ्याचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर अॅडमिरल दिनेशकुमार त्रिपाठी यांच्या नेतृत्वात नौदलाचे आयएनएस सह्याद्री, आयएनएस शक्ती आणि आयएननएस कार्मोता ही तीन लढाऊ जहाजे २१ ते २५ मे या कालावधीत व्हिएतनामच्या दौऱ्यावर असतील. ही तिन्ही जहाजे सोमवारी व्हिएतनामच्या तियन सा पोर्ट दनांग येथे पोहोचतील.