Breaking News

इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी समन्वयाने तोडगा काढणार : पालकमंत्री चंद्रकांत पाटील


कोल्हापूर : इचलकरंजी शहरासाठी शासनाच्या अमृत योजनेतून मंजूर झालेल्या वारणा पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी एक समिती स्थापन करून समन्वयाने तोडगा काढण्यात येईल, असे प्रतिपादन महसूलमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

वारणा पाणीपुरवठा योजनेसंबंधी आज मंत्रालयात श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खासदार राजू शेट्टी, माजी आमदार विनय कोरे, माजी खासदार निवेदिता माने, वारणा योजना विरोधी कृती समितीचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर, स्थानिक आमदार उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर,वारणा योजना कृती समितीच्या सदस्य तथा इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अॅड. अलका स्वामी आदींसह वारा योजना विरोधी समिती व वारणा योजना कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.