Breaking News

प्रत्येक महिलेला दुधाळ पशुधनाचे वाटप- पंकजा मुंडे


पुणे : शासनाच्या वतीने प्रत्येक महिलेला दुधाळ पशुधनाचे वाटप करण्यात येईल. हे पशुधन सांभाळण्यासाठी उत्तरप्रदेशच्या धर्तीवर गायी म्हशींसाठी होस्टेल उभारण्यात येईल, असे प्रतिपादन ग्रामविकास,महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. 

पशुसंवर्धन दिनानिमित्त आयोजित पशुपालक महामेळावा आणि राज्यस्तरीय आभासी प्रशिक्षण कार्यक्रम व तांत्रिक कार्यशाळेचे उद्घाटनप्रसंगी श्रीमती मुंडे बोलत होत्या. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार विजय काळे, महेश लांडगे, कृषि, पशुसंवर्धन विभागाचे सचिव किरण कुरुंदकर, आयुक्त कांतीलाल उमाप आदी उपस्थित होते.