कुमारस्वामींच्या शपथविधीला शक्तीप्रदर्शन मोदी विरोधक एकवटणार ; तिसर्या आघाडीची नांदी
बंगळुरू/वृत्तसंस्था : शपथ घेण्याच्या 24 तासांपूर्वीच आपण बहुमत सिद्ध करू, असे जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले. सोमवारी आपण दिल्लीला जाणार असून राहुल गांधी व सोनिया गांधींची भेट घेऊ असेही कुमारस्वामींनी सांगितले. कुमारस्वामी बुधवारी 23 मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यापूर्वी रविवारी काँग्रेस व जनता दलाच्या पक्ष नेत्यांची भविष्यातील भूमिकेसंदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजपच्या येडियुरप्पांनी बहुमत चाचणीपूर्णी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस-जेडीएस आघाडीला सरकार स्थापनेसाठी राज्यपालांनी आमंत्रण दिले. त्यानुसार 23 मे रोजी कुमारस्वामी मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करतील. कुमारस्वामी 21 मे रोजी शपथ घेतील अशी शक्यता होती, परंतु त्या दिवशी माजी पंतप्रधान राजीव गांधींची पुण्यतिथी असल्यामुळे शपथविधी 23 मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. कुमारस्वामींनी विविध राजकीय नेत्यांना शपथविधी समारंभासाठी बोलावले आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी, मायावती यांच्यासह अनेक नेत्यांना शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले आहे.
दरम्यान, भाजपच्या विजयाच्या अश्वमेधाला कर्नाटकात ’ब्रेक’ लागल्यानंतर विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राष्ट्रीय पक्षांना सत्ता स्थापनेसाठी प्रादेशिक पक्षांचा आधार घ्यावा लागल्याने तिसर्या आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकातून तिसर्या आघाडीचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कर्नाटक निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मात्र, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना एकहाती सत्ता संपादन करण्यात अपयश आले. संख्याबळाचा आकडा गाठता न आल्यामुळे येडियुरप्पांना सत्तेवरून पायऊतार व्हावे लागले. जेडीएस आणि काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा पर्याय खुला झाला. त्यामुळे प्रादेशिक पक्षच ’किंगमेकर’ ठरणार असल्याच्या शक्यतेला बळ मिळाले. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी यापूर्वीच तिसर्या आघाडीच्या स्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जेडीएस सर्वेसर्वा एच.डी.देवेगौडा, डीएमकेचे नेते स्टॅलिन यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. येडियुरप्पांच्या राजीनाम्यानंतर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी यांनी कुमारस्वामींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याच्या वृत्ताला देखील दुजोरा दिला आहे.
विरोधकांचे शक्तिप्रदर्शन
भाजपला एकजुटीचा इशारा देण्याची रणनीती विरोधकांनी आखली असून, कुमारस्वामी जेव्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, तेव्हा विरोधी पक्ष जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. देशभरातील प्रमुख 17 विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे नेते तर असतीलच, शिवाय इतर पक्षांचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही शपथविधी सोहळ्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे.