Breaking News

164 दिव्यांग शाळांचा कायम शब्द काढण्यासाठी उपोषण


सोलापूर : 164 दिव्यांग शाळांचा कायम हा शब्द काढून टाकावा, तसेच अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी अपंग कल्याण कायम विना अनुदानित विशेष शाळा व कर्म शाळा संघटनेतर्फे गुरुवारी (दि. 24) सकाळी 11 वा. आझाद मैदान मुंबई येथे अमरण उपोषण केले जाणार आहे. संघटनेचे अध्यक्ष अण्णा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात येईल, अशी माहिती जगदीश कलकेरी यांनी दिली. 

गेल्या 10 ते 15 वर्षापासून स्वयंसेवी संस्था कायम विना अनुदान तत्वावर संपूर्ण महाराष्ट्रभर दिव्यांग निवासी शाळा चालवित आहेत. शासनाने सर्वसाधारण शाळेचा विचार करुन त्यांचे कायम शब्द काढून अनुदान तत्त्वावर मान्यता दिलेली आहे. परंतु शासन दिव्यांग शाळांचा उद्याप कायम शब्द काढलेला नाही. कायम शब्द वगळून शंभर टक्के अनुदानास मंजुरी मिळणार नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार आहे, असे पत्रकाव्दारे कळविले आहे.