Breaking News

लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदान


अनुसूचित जाती आणि नवबौद्धांच्या सबलीकरणासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेत जमीन खरेदीसाठी आतापर्यंत लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येत होते. मं त्रिमंडळाच्या बैठकीत यात भरीव वाढ करण्याचा निर्णय झाला असून लाभार्थ्यांना एकूण 100 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत जमीन खरेदीसाठी आर्थिक व्याप्तीत ही वाढ करण्यात आली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्य्ररेषेखालील भूमिहिनांसाठी त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत वाढविणे, त्यांना कसण्यासाठी जमीन उपलब्ध करून देणे अशी तरतूद कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेत करण्यात आली आहे. या आधी चार एकर जिरायती (कोरडवाहू) वा दोन एकर बागायती (ओलिताची) जमीन देण्यात येत होती. त्यासाठी 50 टक्के अनुदान आणि 50 टक्के बिनव्याजी कर्जाची सोय सरकारच्या माध्यमाने क रण्यात येत होती. लाभार्थ्यांना प्रतिएकर 3 लाख रूपयांची मर्यादा आतापर्यंत होती. नवीन निर्णयानुसार रेडिरेकनरची किंमत अधिक 20 टक्क्यांपर्यंत आर्थिक मदत करण्यात येणार आहे. तरीही जमीन मिळत नसल्यास 20 टक्क्यांच्या पटीत 100 टक्क्यांपर्यंत म्हणजेच रेडिरेकनरच्या दुपटीपर्यंत मदत वाढवण्यात येणार आहे. त्याचबरोबर नव्या तरतुदीत जिरायतीसाठी कमाल मर्यादा प्रतिएकरी 5 लाख रूपये आणि बागायतीसाठी प्रतिएकरी 8 लाख रूपये करण्यात आली आहे.