Breaking News

इंदिरा गांधी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड.


श्रीगोंदा ( प्रतिनिधी ) इंदिरा गांधी पॉलिटेक्निक , बेलवंडी ता. श्रीगोंदा येथे इटॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. या बहुराष्ट्रीय कंपनीच्या रांजणगाव युनिटने अंतिमवर्ष मेकॅनिकल इंजिनिअरींग मध्ये शिकत असलेल्या विदयार्थीसाठी कॅम्पस इन्टरव्हयु आयोजित केला. कॉलेजमधील 19 विदयार्थ्यांना गुणवत्तेवर तृतीय वर्ष निकाला अगोदरच कंपनी मध्ये नोकरी करणेची संधी उपलब्ध झाली आहे. सर्व यशस्वी विदयार्थ्यांना कंपनीने आकर्षक पॅकेजची ऑफर दिली आहे. विदयार्थ्यांच्या कँम्पस इन्टरव्हयु बाबत कंपनीच्या एच.आर.डिपार्टमेंटच्या प्रभामाई प्रधान , महेश देवरे, प्रविण जाधव , कॉलेजचे प्राचार्य गोरे एस.बी, विभाग प्रमुख हवालदार ए.आय, ट्रेनिंग अँन्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.साळवे एस.एस व विभागातील स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले. निवड झालेल्या सर्व विदयार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव (बापू) नागवडे, चेअरमन राजेंद्रदादा नागवडे, व्हाईस चेअरमन केशवभाऊ मगर , सर्व विश्‍वस्त मंडळ व निरीक्षक सचिन लगड यांनी अभिनंदन केले.