Breaking News

ज्ञान, कौशल्यांच्या आधारावर आत्मनिर्भर करणारी संजीवनी संस्था : मोंजे


संजीवनी एम.बी.ए. ही संस्था विध्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सोयी सुविधा पुरविणारी आणि भविष्यात स्वतःच्या ज्ञानाच्या आणि कौशल्यांच्या आधारावर आत्मनिर्भर करणारी संस्था असुन येथील विद्यार्थी कार्पोरेट जगताच्या संस्कृतीला लवकर आत्मसात करतील असे येथे राबविण्यात येत असलेले उपक्रम आणि मागील काही वर्षांच्या उपलब्धींवरून जाणवत असल्याचे गौरवोद्गार मुंबईस्थित बहुराष्ट्रीय पेपे जीन्स कंपनीच्या मानव व संसाधन विभागाचे संचालक प्रासद मोंजे यांनी काढले.

संजीवनी एम.बी.ए. मधुन 2017-18 या शैक्षणिक वर्षातून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांच्या तुकडीच्या निरोप समारंभ कार्यक्रमात मोंजे प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, प्राचार्य डॉ. डी. एन. क्यातनवार, डॉ. शांतम शुक्ला, एम.बी.ए. विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विनोद मालकर उपस्थित होते.

डॉ. क्यातनवार यांनी सांगीतले की, आज नामांकित कपन्यांमध्ये नोकर्‍या मिळविणे अवघड असते. परंतु व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली उद्योग जगताला आवश्यक असलेले मनुष्यबळ तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात, यामुळेच संजीवनी एम.बी.ए. चे 80 टक्यांपेक्षा अधिक विध्यार्थ्यांना त्यांच्या अंतिम निकाला अगोरदच नोकरीचे नेमणुकपत्र प्राप्त झाले आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थी अर्पल दगडे, सेजल जैन व यश खांबेकर यांनी तर प्राजक्ता कुलकर्णी हीने आभार मानले.