Breaking News

दहा हजारांची लाच घेताना सहाय्यक अभियंता जाळ्यात


जळगाव,  जिल्ह्यातील सावदा येथील तक्रारदाराकडून नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी दहा हजारांची लाच घेताना सहाय्यक अभियंता राजेश लक्ष्मण भंगाळे याला आज शुक्रवारी सावदा येथे एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई एसीबीचे आधिकारी करीत आहेत.