Breaking News


कर्जत पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेमध्ये कर्जत तालुक्यातील सहभागी गावांमध्ये श्रमदान करण्यासाठी चढाओढ लागली आहे. दिवसागणीक गावागावात श्रमदानासाठी लोकसहभागही वाढत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे शिवार असलेल्या कर्जत तालुक्यातील बेलगाव, टाकळी खंडेश्‍वरी, चापडगांव या गावात स्पर्धा सुरू झाल्यापासुनच्या 15 दिवसात 900 पुरूष व 700 महिलांनी मिळून 800 घनमीटर लांबीची सलग समतल चर व लूज बोल्डर 8 कामे केली असुन, गावात श्रमदान चळवळीतुन जलसंधारणाबरोबरच मनसंधारणाचेही कामही सुरू आहे. आतापर्यत जैन समाज, रोटरी संघटना, डॉक्टर असोसिएशन, मेडीकल संघटना, शिक्षक संघटना, तलाठी व ग्रामसेवक संघटना, महिला संघटना, कृषी व महसुल विभाग यांनी प्रत्येक गावात जाऊन श्रमदान केले. ते एकत्रीत 920 रनींग मीटर काम केले आहे. या कामाची पैशात मोजणी केल्यास 40 हजार रूपयांचे काम केलेले आहे. तर केलेल्या श्रमदान कामामुळे 9 लाख 20 हजार लीटर पाणी अडविले जाणार आहे. याशिवाय प्रत्येक गावाने केलेले श्रमदान हे वेग-वेगळे आहे.

स्पर्धेमुळे गावात खरोखरच एकीचे तुफान आलंयावाटर कप स्पर्धेमध्ये कर्जत तालुक्यातील 41 गावांनी सहभाग नोंदविला असुन, या गावात मोठया प्रमाणात कामे सुरू आहेत. बेलगांव येथे 7 एप्रिल रोजी रात्री 12 वा. ग्रामस्थ, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, तहसिलदार, जैन संघटना यांच्यासह गावकर्‍यांनी मिळून कामास सुरूवात केली. त्यानंतर पहिल्या दिवसापासुनच 100 पेक्षा जास्त महिला-पुरूष सीसीटीचे काम करीत आहेत. याकामी ग्रामस्थांबरोबरच रोटरी क्लब, शिक्षक संघटना, महिला संघटना, पत्रकार मित्र, डॉक्टर संघटना श्रमदान करीत आहेत.


जैन संघटना सक्रीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या सक्रीय सहभागाने भराहुन जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवीन बोरा, तालुकाध्यक्ष अभय बोरा यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प संचालक अशिष बोरा, राशीन शहराध्यक्ष राकेश भंडारी, पिंटू शर्मा, नयन मंडलेचा, वैभव शहा, अनिल खाटेर, राकेश देसाई, वरद म्हेत्रे, रोटरीचे नितीन देशमुख, डॉ. राजेंद्र खेत्रे, डॉ. कांचन खेत्रे, राहुल सोनमाळी, स्त्री फाऊंडेशनच्या मनीषा सोनमाळी, अस्मीता ग्रुपच्या मिनाक्षी साळुंके, पाणी फाऊंडेशनचे अमोल लांडगे, योगेश अभंग, बाळासाहेब बगाटे, शरद थोरात, बाळासहेब चांडे, जयदिप जगताप यांसह आदिंनी आपला सक्रीय सहभाग सहभाग नोंदविला आहे.