Breaking News

बौध्दपौर्णिमेनिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन


बौध्दपौर्णिमा व तथागत भगवान गौतमबुद्ध यांचे जयंतीनिमित्त दि. 30 एप्रिल रोजी भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने संपूर्ण जिल्हाभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे अहमदनगर जिल्हा सरचिटणीस संजय खंडीझोड व श्रीरामपुर तालुका अध्यक्ष सुगंधराव इंगळे यांनी दिली आहे.
 प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर व कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांनी देशभरात तथागत भगवान गौतम बुद्धांची 2562 वी जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्याचे सुचवले होते. या सूचनेचा आदर करून भारतीय बौद्ध महासभेच्या अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बुद्धपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बौद्ध पौर्णिमेनिमित्त श्रीरामपूर येथील लुंबिनी बुद्धविहार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 
बौद्ध महासभेच्या प्रशिक्षण विभागाच्यावतीने बुद्धांचे पवित्र मंगलदिन म्हणून वर्षात येणार्‍या 12 पौर्णिमा साजर्‍या करून, वैशाखी पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यावर्षी पौर्णिमेच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांनी दिलेला शांतीचा संदेश, सलोख्याचे वातावरण या विषयीचे प्रबोधन, व्याख्यान देवून भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धांच्या जीवनावरील विचार सांगून बुद्धपौर्णिमा उत्साहात साजरी करावी असे आव्हान भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा विशाखा निळे, सरचिटणीस संजय खंडीझोड, वैशाली आहिरे, भगवान गायकवाड, माधवराव गायकवाड, अनिता पातारे, डी.एस. कांबळे, अनंत भांताब्रेकर, गौतम पगारे, रवींद्र जगताप यांचेसह आदिंनी केले आहे.