Breaking News

कोल्हार महाविद्यालयात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा 38 वा पुण्यतिथी समारंभ


राहाता सहकाराचे तत्वज्ञान श्रेष्ठ आहे, माणसाच्या माणूसपणास आणि विकासाला चालना देणारे आहे. प्रवरा भूमी वेगळी आहे, पद्मश्रींच्या रूपाने इथे विचार जन्माला आला आणि त्याचा जागर निरंतर चालू आहे. सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन पद्मश्रींनी शोषितांसाठी लोकचळवळ उभी केल्याचे प्रतिपादन मराठी विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र सलालकर यांनी केले. ते प्रवरा ग्रामीण संस्थेच्या येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 38 व्या पुण्यतिथी समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालय परीक्षा अधिकारी डॉ. भाऊसाहेब नवले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. राजेंद्र वडमारे यांनी केले.

डॉ. सलालकर म्हणाले पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील बहुजनांच्या भूमिकेचे समर्थन करणारे, लोकचळवळ उभी करणारे उत्तम संघटक आणि लोकनेते होते. निरंतर विकासाचा ध्यास आणि तळागाळातील माणसांच्या प्रगतीची आस त्यांना होती. सन 1923 ला लोणी येथे पतपेढीची सुरू करून सहकाराची कृती आणि सुरूवात झाली. याप्रसंगी डॉ. प्रवीण तुपे, प्रा. राकेश माळी, प्रा. अमोल खर्डे, प्रा. आदिनाथ दरंदले, डॉ. सोपान डाळिंबे, डॉ. गणेश देशमुख, प्रा. विनोद कडू, दीपक भाने, अनिल आहेर, प्रा. असिफ पठाण, प्रकाश पुलाटे, प्रा. राणी गायकवाड, प्रा. अमृता म्हस्के, प्रा. कविता राऊत, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थिती होते. सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा विखे यांनी केले. प्रा. पांडुरंग औटी यांनी आभार मानले.