कोपरगांवः तालुक्यातील संवत्सर येथील पावन हनुमान मित्र मंडळाच्यावतींने गोदावरी नदी पात्र साफ सफाई स्वच्छता अभियानास सुरूवात करण्या त आली. मंडळाचे हे पाचवे वर्ष आहे. संवत्सर आणि कोकमठाण या दोन गावादरम्यान ऐतिहासिक ‘गोफणधोंडा’ युध्द खेळले जाते. पण ते दोन्ही गांवच्या ग्रामस्थांनी एकत्रित ठराव करून ते बंद केले. अक्षयतृतीयेपासून या युध्दास सुरूवात व्हायची. संवत्सर येथील पावन हनुमान मित्रमंडळ गेल्या पाच वर्षांपासून त्याची आठवण म्हणून नदीपात्र स्वच्छ करत असते. गोदावरी नदीपात्रात विविध देव देवतांचे जीर्ण झालेले फोटो, काटेरी फास, गोधडया, जुने कपडे अंत्यविधी तसेच दशक्रियाविधी झाल्यानंतर उरणारा व टाकला जाणारा कचरा, प्लास्टिकच्या बाटल्या, गणपती विर्सजनप्रसंगी टाकण्यात आलेल्या विविध मुर्त्या त्यासाठी वापरला जाणांरा काथ्या, मुर्ती मंदिर सजावटीसाठी वापरले जाणांरे थर्मोकोल विविध हार आदी तत्सम साहित्य जमा करून हा सगळा कचरा जाळून नष्ट केला जातो. या अभियानाची सुरूवात पावन हनुमान मित्र मंडळांने २०१३ पासून केली आहे.
गोदावरी स्वच्छता अभियानास प्रारंभ
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:59
Rating: 5