Breaking News

वैद्यकिय क्षेञात मोठी संधी आहे केवळ व्यवसाय म्हणून याकडे न बघता संशोधन करावे


वैद्यकिय क्षेञात मोठी संधी आहे केवळ व्यवसाय म्हणून याकडे न बघता समाजसेवा आणि संशोधन करावे. अर्थपूर्ण वैद्यकीय शिक्षण,वैद्यकीय सेवा,संशोधन आणि त्यसेवेशी संलग्न असणाऱ्या तांत्रिक व्यवसायाचे शिक्षण यावर भर देऊन समाज सेवेशी कटिबद्ध राहिल्याने प्रवरा अभिमत विद्यापीठाने देशात नावलौकिक मिळवल्याचे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पंडित भालचंद्र विद्यासागर यांनी केले. यावेळी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ४२६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

लोणी (जि.अहमदनगर) येथील प्रवरा अभिमत विद्यापीठाचा बारावा दीक्षांत समारंभात डॉ.विद्यासागर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.विद्यापीठाचे कुलपती डॉ.विजय केळकर समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,उपकुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील,कुलगुरू डॉ.वाय. एम.जयराज,माजी कुलगुरू डॉ.एम.जे.ताकवले,सौ.मोनिका सावंत-इनामदार,सौ.सुवर्णाताई विखे पाटील,एम.एम.पुलाटे प्रवरा शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ.सर्जेराव निमसे,डी. एन.अग्रवाल.डॉ.एन.एस.म्हस्के,एम.एन.गुलाटी, डॉ.रवींद्र कवडे, युवराज नरवडे,डॉ.राहुल कुंकुलोळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,पद्मश्री विखे पाटील व पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या दुरदृष्टीतून हे विद्यापीठ व रुग्णालय उभे राहिले.देशाच्या सर्वच भागातून विद्यार्थी इथं येऊन गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षण घेत आहेत.त्यातून विद्यापीठाची शान वाढते. विद्यापीठाचे काम कौतुकास्पद असून डॉ.राजेंद्र विखे पाटील व त्यांचे सहकारी त्यासाठी परीश्रम घेत आहेत.येथून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी गरीब,गरजू आणि उपेक्षितांना आरोग्य सेवा पुरवण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले.