गोरोबा काका विठ्ठलाचे निःस्सीम भक्त : आ. कोल्हे
राज्यातील थोर संत म्हणून गोरा कुंभार यांची ख्याती आहे. नामदेव आणि ज्ञानेश्वर यांच्याकाळातील समकालिन संत म्हणूनही त्यांना संबोधले जाते. विठठलाची भक्ती करून त्यांनी तमाम वारकरी बांधवांसाठी असंख्य अभंग लिहीले. विठ्ठलाचे ते निःस्सीम भक्त होते, असे प्रतिपादन आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.
कोपरगांव शहरात कुंभार समाजाच्यावतीने संत गोरोबाकाका पुण्यतिथीनिमित्त सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. गोरोबा काकांच्या प्रतिमेचे पुजन आ. कोल्हे यांच्या हस्ते करण्यांत आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी श्री दत्तोबा जोर्वेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्तविक केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष विजय वाजे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, गटनेते रविंद्र पाठक, पराग संधान, भाजपाचे शहराध्यक्ष कैलास खैरे, गोपी गायकवाड, विनायकराव गायकवाड, अजिनाथ ढाकणे, विवेक सोनवणे आदी उपस्थित होते.