Breaking News

१८ तास अभ्यासाद्वारे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन


लोणी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सलग १८ तास अभ्यास करून या महामानवाची जयंती साजरी करत तरुणाईला वैचारिक क्रांतीचा संदेश दिला. 
लोणी येथे अदिवासी मुलांच्या शासकीय आदिवासी वसतिगृहामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेले ५० विद्यार्थी राहत आहेत. ते अभियांत्रिकी, फार्मसी कृषी, कला ,वाणिज्य व विज्ञान तसेच डिप्लोमा आणि ज्युनियर महाविद्यालयांमधून शिक्षण घेत आहेत. या वसतिगृहाचे प्रमुख गणेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या वसतिगृहतील राजेंद्र बांडे, मयूर गवारी, उमेश बोरसा, नितेश वसावे,विलास वसावे, किरण देशमुख, गोकुळ चौधरी, ऱ्हिदम टोपले, नवनाथ कांबळे, शनेश्वर गांगुर्डे या विद्यार्थ्यांनी रविवारी {दि. १५} सकाळी सहापासून वाचनाला सुरवात केली. रात्री १२ वाजेपर्यंत असा सलग १८ तास अभ्यास करण्याचा विक्रम करत या विद्यार्थ्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आचरणातून साजरी केली. या आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी साजरी केलेली डॉ. बाबासाहेबांची जयंती तरुणांना प्रेरणादायी देणारी ठरेल.