निधानेंच्या हत्येप्रकरणी पोलिसांना धागेदोरे मिळेना
राहाता प्रतिनिधी :येथील रामदास निधाने या तरुणाचा मृतदेह आढळून तीन दिवस झाले. मात्र पोलीसांना अद्याप या प्रकरणाचा कुठल्याही प्रकारचा धागेदोरा हाती लागलेला नाही. या प्रकरणातील दोषींना तात्काळ अटक व्हावी व सदरचा तपास पोलीसांनी जलदगतीने करावा, अशी मागणी मयत निधन यांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
गेल्या शुक्रवारी {दि. १३ } रामदास आसाराम निधाने या तरुणाचा मृतदेह हॉटेल शिवनेरीसमोर आढळून आला. शवविच्छेदनाच्या अहवालात सदर तरुणाचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे राहाता पोलीसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. मयताच्या नातेवाईकांनी आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी नगर-मनमाड रोडवर रास्तारोको आंदोलन केले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून नगर येथील श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. या सर्व बाबींमुळे शहरात एकच खळबळ उडाली. शहरात भितीचे वातावरण झाले आहे.
दरम्यान, या खूनाच्या तपासाबाबत पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांना विचारले असता ते म्हणाले, सदर घटनेचा तपास हा योग्य पध्दतीने सुरु आहे. त्यासाठी थोडा अवधी लागेल, असे त्यांनी सांगितले. राहाता परिसरात यापूर्वी दोन-तीन तरुणांची हत्या झाली आहे. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र असल्याने या परिसरात हॉटेल व लॉजिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. शेतीसाठी व अन्य व्यवसायासाठी स्थानिक मजूर मिळत नाही. त्यामुळे परप्रांतीय मजुरांना हॉटेल व इतर व्यवसायासाठी अनेकांनी कामास ठेवले आहे. त्यामुळे परप्रांतीय येणाया तरुण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. तालुक्यात चैन स्नॅकींग, दुचाकी चोरी, दरोडा, घरफोड्या, हत्या अशी गुन्हेगारी फोफावत चालली आहे. या सर्व गोष्टींबरोबरच मोठ्या व्यावसायिकांनी सी.सी. टी.व्ही. कॅमेरे बसविणे बंधनकारक आहे. त्यामुळे गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल. याकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.