गाडेंनी प्रामाणिक सेवेतून विद्यार्थी घडविले : विखे
संगमनेर तालुक्यातील पिप्रीं-लौकी आजमपूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बाबुराव गाडे यांच्या सेवापूर्ती कृतज्ञता समारंभात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भाऊसाहेब मुंढे होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब भोसले, जिल्हापरिषद सदस्या अँड. रोहिणी निघुते, संचालक प्रतापराव तांबे, देविचंद तांबे, डॉ. हरिभाऊ तांबे, माजी प्राचार्य विठ्ठल वर्पे, अँड. पोपटराव वाणी, भाऊसाहेब लावरे, विजय आहेर, सरपंच अलका गिते, शिक्षणाधिकारी रेटरेकर, विठ्ठल गायकवाड, भारतराव गिते, सुखदेव गिते, गोकुळ गिते, दादाहरी गिते आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक भाऊसाहेब गाडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
